गेल्या कित्येक वर्षांपासून दरमहा सुवर्णप्राशन डोस शिबिरांचे सातत्यपूर्ण आयोजन
सिडको येथे इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे-गांगुर्डे व श्री. विशाल नारायण डोखे यांचा सामाजिक उपक्रम
नाशिक :सिडको, नाशिक परिसरात सामाजिक आरोग्य जागृतीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून दरमहा सुवर्णप्राशन डोस शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. हा उपक्रम इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे-गांगुर्डे व त्यांचे पती श्री.विशाल नारायण डोखे यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविला जात असून नागरिकांमध्ये या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
लहान बालकांच्या आरोग्य संवर्धन व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने दरमहा हे सुवर्णप्राशन डोस शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिरांमध्ये पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत असून अनेक कुटुंबे नियमितपणे आपल्या मुलांचा सहभाग नोंदवत आहेत.
या उपक्रमाचे नियोजन, वेळेचे काटेकोर पालन, शिबिरस्थळी आवश्यक सोयीसुविधा तसेच शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिले जाते. सुवर्णप्राशन डोस देताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक काळजी घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये या शिबिरांविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने राबविल्या जाणाऱ्या या आरोग्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे पालकांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे-गांगुर्डे व श्री. विशाल नारायण डोखे यांचे कार्य परिसरात कौतुकास्पद ठरत आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे आरोग्य व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.










